22 September 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या पदाला धोका नाही, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

राज्य सरकारने मोर्चांच्या आयोजकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.

चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री पदामध्ये बदल करण्याची आमची संस्कृती नाही, असे राज्याचे महसुल मंत्री चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या सुरुवातीला फडणवीस यांनी माझ्या विरोधात कारस्थान रचले जात असल्याचे म्हटले होते. तसेच रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी ‘कीती दिवस मुख्यमंत्री पदावर असेल माहित नाही, पण जोपर्यंत असेल तोपर्यंत परिवर्तनाचे काम करेल.’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या दोन वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही गुजरातमधील माजी मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांच्या प्रमाणे पायउतार व्हावे लागणार का? अशा उलट सुलट चर्चां राजकीय वर्तुळात रंगत होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या पदाला कोणताच धोका नसून फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे सांगत राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदाबद्धल सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला तुर्तास पुर्णविराम दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशी मुख्यमंत्र्यांनीभूमिका मांडली आहे, याची पाटील यांनी आठवण देखील करुन दिली. मराठा मोर्चाची कोंडी राज्य सरकारने मोर्चांच्या आयोजकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. तसेच मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीसमूह बनवण्याचा प्रस्तावही मांडल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 10:00 pm

Web Title: chandrakant patil on cm devendra fadnavis
Next Stories
1 भगवानगडावर दसरा मेळावा होणार? पंकजा मुंडेना कृती समितीकडून निमंत्रण
2 शिवसेना आमदाराकडून शेतकऱ्याला मारहाण, चूक नसल्याचे भुमरेंचे स्पष्टीकरण
3 …तर मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो, मोर्चाला वेगळे वळण लागण्याचाही इशारा
Just Now!
X