30 September 2020

News Flash

चंद्रपूर : करोनामुळं जिल्ह्यात सातवा मृत्यू; बाधितांची संख्या पोहचली ९८८वर

५७९ रुग्ण करोनातून बरे, ४०० जणांवर उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यात १२ ऑगस्टच्या मध्यरात्री ६५ वर्षांच्या करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील असून करोनामुळं झालेला जिल्ह्यातील हा सातवा मृत्यू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ९८८ वर पोहोचली आहे. यांपैकी करोनातून ५७९ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ४०० बाधितांवर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काल ९४४ बाधितांची संख्या होती, आज सायंकाळपर्यंत ती ९८८ वर पोहोचली आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २४, चंद्रपूर तालुक्यातील तीन, राजुरा, नागभिड, गडचांदूर येथील प्रत्येकी एक, बल्लारपूर शहरातील ९, गोंडपिपरी येथील ५ बाधितांचा समावेश आहे. चंद्रपूर शहर शांतीनगर परिसरातील एक, शकुंतला अपार्टमेंट रामनगर परिसरात एक, हनुमान मंदिर इंदिरा नगर परिसरातील एक, फॉरेस्ट एंट्री गेट परिसरातील एक, तुकूम परिसरातील तीन, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील एक, अंचलेश्वर गेट भानापेठ येथील एक, बापट नगर माता मंदिर जवळील एक, गुरुदेव लॉन रिद्धी अपार्टमेंट परिसरातील एक, दडमल वार्ड परिसरातील दोन, जनता कॉलेज परिसरातील एक, लालपेठ चौक येथील दोन, सिव्हिल लाईन येथील एक, वरवट वार्ड नंबर ३ येथील एक, श्री गुरुदत्त संकुल परिसरातील दोन, चव्हाण कावेरी कारखाना परिसरातील एक तर निर्माण नगर परिसरातील एका बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर परिसरातील ऊर्जानगर येथील दोन, वार्ड नंबर ३ नकोडा घुग्घूस येथील एक तर श्रीराम वार्ड नंबर २ येथील एका बाधिताचा समावेश आहे. राजुरा येथील धोपटाळा कॉलनी परिसरातील एक बाधित पुढे आला आहे. गोकुळनगर बल्लारपूर येथील ९ बाधित पुढे आले आहेत. गोंडपिपरी येथील बीडिओ कॉर्टर परिसरातील एक, आझाद हिंद बाजार वार्ड परिसरातील एक, वार्ड नंबर ३ परिसरातील एक तर गोंडपिपरी शहरातील दोन बाधितांचा समावेश आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर तर गडचांदूर येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात १७ हजार १९२ नागरिकांची अॅन्टिजन तपासणी केलेली आहे. यांपैकी १९४ पॉझिटिव्ह असून १६ हजार ९९८ निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ हजार ३८२ नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये ८६४ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. १ हजार ४११ नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 8:07 pm

Web Title: chandrapur seventh death in the district due to corona virus the number of victims reached on 988 aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली, आता मुंबईत होणार उपचार
2 मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; दोन ठार
3 पोलीस दलातील वाहनांचे ‘सारथ्य’ करण्याचा मान महिलांना
Just Now!
X