एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार की नाही? याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी स्मित हास्य करत सध्याची सगळी परिस्थिती पाहता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणारच नाहीत असं नाही असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ लावले जात आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांनी माझ्या आदेशावरुनच पडवींनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं म्हटलं होतं. तेव्हाही राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता आज छगन भुजबळ यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सूचक हास्य करत खडसे राष्ट्रवादीत येणारच नाहीत असं नाही असं म्हटलं आहे.

एकनाथ खडसे हे भाजपात नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी वारंवार बोलूनही दाखवली आहे. आता गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान याच सगळ्या चर्चांच्या अनुषंगाने छगन भुजबळ यांना विचारलं असता ते अत्यंत सूचक पद्धतीने हसले आणि म्हणाले की एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येणार नाहीत असं नाही. फक्त मी याबाबत अधिकृतपणे थेट काही सांगू शकत नाही. छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य सूचक मानलं जातं आहे. आता एकनाथ खडसे नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.