संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार गावाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दोन्ही पुरस्कारावर हिवरे बाजार गावाने नाव कोरले आहे. नाशिक विभागात नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार प्रथम आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही महिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये हिवरे बाजारने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ अभियानात विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत २५ लाख तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये १० लाखांचे बक्षीस हिवरे बाजार गावाने पटकावले आहे. असे एकून ३५ लाख रूपयांचा पुरस्कार हिवरे बाजार गावाला मिळाला आहे. नाशिक विभागात हिवरेबाजारला दहा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अवनखेड (ता.दिंडोरी, जि.नाशिक) गावाला आठ लाखांचे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean village award goes to hivre bajar
First published on: 06-09-2018 at 18:45 IST