26 November 2020

News Flash

दिलासादायक! राज्यात आजही नव्या रुग्णांच्या तुलनेत बरं होण्याऱ्यांच प्रमाण अधिक

आजवर १५ लाखांहून अधिक करोनामुक्त

राज्यात आज दिवसभरात देखील नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५,०३,०५० वर पोहोचली आहे. तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

राज्यात आज दिवसभरात ६,१९० करोनाचे रुग्ण आढळून आले. तर ८,२४१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १२७ करोनाबाधितांचा आज मृत्यू झाला, त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.६२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील २५,२९,४६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२,४११ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १,२५, ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे शहरात २८४ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २८४ नवे रुग्ण आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच करोनावर उपचार घेणार्‍या ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पिंपरी-चिंचवड शहरात आज १७३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि ४ जणांचा मृत्यू झाला. तर, १२१ जण करोनामुक्त झाले. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:10 pm

Web Title: comfortable in the state even today the rate of recovery is higher than the number of new patients aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार
2 मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर नेणार मशाल मोर्चा!
3 “एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रयत्नशील”
Just Now!
X