अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा प्रचंड गाजला. त्यातून राजकीय वादविवाद झडले. अजूनही या मुद्द्यावर पडदा पडलेला नाही. अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत दाखल होताच काँग्रेसनं एनसीबीला एनसीबीला प्रश्न विचारत चौकशीची आठवण करून दिली आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्याची कबूली देतानाचा कंगनाचा व्हिडीओही काँग्रेसनं ट्विट केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी मुंबईत दाखल झाली. मुंबईत दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला सवाल करणार ट्विट केलं आहे. ‘आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो,’ अशी कबूली देणारा कंगनाचा व्हिडीओ ट्विट करत भाजपालाही लक्ष्य केलं. आहे.

आणखी वाचा- “मला मुंबईत राहण्यासाठी केवळ त्याच्या परवानगीची गरज…”; कंगनाचा टोला

“डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला

भाजपा महाराष्ट्राची माफी मागणार का?

“भाजपाने तिला (कंगना) झांशीची राणी म्हटलं आहे आणि महाविकास आघाडी सरकार तिला ही माहिती पोलिसांना देऊ देत नाही, असा आरोपही केला आहे. एनसीबीला माहिती देण्याची विनंती राम कदम आता कंगनाकडे करतील का? महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल भाजपा माफी मागणार का?,” असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.