News Flash

निवडणुकीसाठी काँग्रेसची मुंबईत बुधवारी बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मुंबईत बुधवारी (दि. २१) दुपारी १ वाजता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी

| August 19, 2013 12:18 pm

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मुंबईत बुधवारी (दि. २१) दुपारी १ वाजता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत‘व्हिजन-२०१४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या बैठकीस जिल्ह्य़ातील पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी पत्रकाद्वारे केले.
व्हिजन-२०१४ कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी व्यापक जनसंपर्क अभियान सप्टेंबरपासून पक्ष राबवणार आहे, केंद्र व राज्याच्या विविध योजनांची माहिती असलेली‘चित्ररथ यात्रा प्रत्येक जिल्ह्य़ात फिरवली जाणार आहे. यात्रेत राज्यातील मंत्री, खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी सभा घेणार आहेत. त्याचे नियोजन मुंबईतील बैठकीत केले जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्य़ातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ससाणे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 12:18 pm

Web Title: congress meeting for election on wednesday in mumbai
टॅग : Election
Next Stories
1 जिल्ह्य़ातील तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी देऊ- भुजबळ
2 जाहिरातबाज मोदींकडून जनतेची दिशाभूल- मुख्यमंत्री
3 हॉस्टेलमधील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X