तिवसा तालुक्यातील पाणीप्रश्नावरुन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर सोमवारी चांगल्याच संतापल्या. संतापाच्या भरात यशोमती ठाकूर यांनी सर्वांसमक्षच अधिकाऱ्यांना खडसावले. यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना खडसावताना अपशब्दांचाही वापर केला असून तू हसू नको, याच अधिकाऱ्याने आदेश दिले, हाच अधिकार राजकारण करतोय, असा आरोप त्यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिवसा तालुक्यासाठी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तिवसा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी रात्री १२ वाजता अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र, आमदार अनिल बोंडे यांनी विरोध दर्शवल्यानंतर सिंचन विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

तिवसाचे नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी आक्रमक होत सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. यशोमती ठाकूर व रणजीत कांबळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पक्षपाताचा आरोप केला. यशोमती ठाकूर यांनी अपशब्दांचा वापर केल्याने वातावरण चिघळले. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणाही याप्रसंगी देण्यात आल्या.

तिवसा तालुक्यातच नव्हे, तर मोर्शी आणि चांदूर रेल्वे तालुक्यातही भीषण पाणीटंचाई आहे. वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती. शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी यातही राजकारण दिसत आहे. लोकांच्या हक्काचे हे पाणी आहे. धरणात पुरेसे पाणी असतानाही खालच्या भागातील लोकांना ते नाकारणे धक्कादायक आहे, म्हणून सोमवारी आंदोलन करण्यात आले, असे यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांना