News Flash

काँग्रेसकडून येत आहेत आघाडीत सामील होण्यासाठीचे निरोप-प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रकाश आंबेडकर यांची सडकून टीका

प्रकाश आंबेडकर

काँग्रेसतर्फे आघाडीत सामील व्हा असे निरोप येत आहेत अशी माहिती भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही, आमच्यासोबत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच पदावर असणार आहात तोपर्यंत जी नाटकं करायची आहेत ती करा त्यानंतर तुम्ही पदावर नसाल असेही आंबेडकरांनी म्हटले आहे. पुढच्या टर्मला तुम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री नसाल असाही दावा आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

मनोहर भिडेंना  मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर आंबेडकरानी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आहे.फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यत मुख्यमंत्री आहेत. त्यांनर नाही. त्यामुळे तोपर्यत काय नाटकं करायची आहेत ती करूदे. मिरज दंगलीप्रकरणी सांगलीच्या पोलिस अधीक्षकांनी चांगले रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेण्यास आपला कायमच विरोध असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतर आम्ही परत चौकशी सुरू करणार असल्यांचे ते यावेळी म्हणाले.पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा भिडेना नक्कीच तुरुंगात पाठवू असा इशारा त्यानी दिला.

सध्या काँग्रेस आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासाख्या बड्या नेत्यांचेही आपल्याला निरोप येत असतात. लोकसभेच्या सगळ्या जागा लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढते आहे. त्यामुळे काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी हातमिळवणी करावी. लोकसभेच्या अनेक जागांवर द्यायला काँग्रेसकडे चांगले उमेदवार नाहीत. तडजोड किंवा समजुतीच्या मार्गाने हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल सुद्धा धार्मिकतेकडे झुकले : आंबेडकर
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा धर्मिकतेकडे झुकत आहेत. मठ आणि मंदिरे यांना भेटी देत आहेत याआधी त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी असं कधीही केलं नाही असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 6:13 pm

Web Title: congress sent messages for alliance says prakash ambedkar
Next Stories
1 भाजपाला धक्का, अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार
2 पुण्यात शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका
3 मांजरा नदीत बुडून कासराळीच्या दोन युवकांचा मृत्यू
Just Now!
X