News Flash

‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ ; पोस्टरमुळे भाजपाविरोधात संताप

‘छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे एकमेव राजे आहेत’

(व्हायरल पोस्टर)

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर ‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’अशा मजकुराचे पोस्टर लावण्यात आल्याने नेटकऱ्यांकडून भाजपाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेसाठी शुभेच्छा देणारे पोस्टर अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर लावण्यात आल्याचं समोर आलं आहे.

महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणाऱ्या या पोस्टरवर ‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून ‘छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे एकमेव राजे आहेत’ असे अनेकांनी ठणकावून सांगितले आहे.

स्थानिक रहिवासी हेमंत मुळ्ये या ट्विटर युजरने सर्वप्रथम ही बाब निदर्शनास आणून दिली. रस्त्यावर अशाप्रकारचे पोस्टर दिसल्यानंतर मुळ्ये यांनी तो फोटो शेअर करत मुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपा यांना ट्विटरद्वारे टॅग केलं आणि “आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा…अशी मागणी केली. यासोबतच महाराष्ट्राचा राजा एकच…छत्रपती शिवाजी महाराज असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. आपल्या ट्विटसोबत त्यांनी अहमदनगर पोलिसांनाही टॅग केलं होतं. मुळ्ये यांचं ट्विट आणि पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झालीये. विरोधकांसह नेटकऱ्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, ट्विट व्हायरल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ते पोस्टर हटवलं आहे. पोस्टर हटवल्यानंतर, “अखेर तो बॅनर हटवला…बॅनर काढल्याबद्दल धन्यवाद … भविष्यात कुठल्याही राजकीय पक्षांनी राजा शिवछत्रपतींशी तुलना करू नये ही नम्र विनंती” असं ट्विट मुळ्ये यांनी केलं आहे.

एक नजर सोशल मीडियावरूल प्रतिक्रियांवर –

दरम्यान, ट्विटनंतर पोस्टर हटवल्याबाबत हेमंत मुळ्ये यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे आभार मानलेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:05 pm

Web Title: controversy over cm banner on ahmednagar aurangabad highway devancha raja indramaharashtra cha raja devendra sas 89
Next Stories
1 सापाने मेट्रोतून केला चक्क 2500 किलोमीटरचा प्रवास
2 भारतीय चाहत्यांनी धमकी दिल्यानंतर काश्मीर मुद्द्यावरुन शोएब अख्तरचा यु-टर्न, म्हणाला…
3 Video : लाडक्या शिक्षकाची बदली होताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा पूर
Just Now!
X