कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील करोना संसर्ग झालेल्या दोन इंटरन्स वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या तसेच दरम्यानच्या काळात रुग्णालयातून उपचार घेतलेल्या काही संशयित रुग्णांना रुग्णालयात अलगीकरण करून ठेवण्यात आले होते. मात्र आता कासा उपजिल्हा रुग्णालयातील संस्थात्मक अलगीकरण कक्षातून तब्बल 24 संशयित रुग्णांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर कर्मचारी व इतर नागिरीक अशा 176 संशयित रुग्णांचे संस्थांत्मक अलगिकरण करण्यात आले होते.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर

विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या परिसराला पोलिसांचा वेढा असून पोलिसांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवून हे संशयित रुग्ण पळाले आहेत. या रुग्णांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के मारण्यात आले नसल्याचे तसेच त्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले.

तर, गुरुवारी रात्री कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडचिंचले या गावात स्थानिक ग्रामस्थांनी तीन प्रवाशांची क्रुरतेने हत्या केली होती.  पोलीस या प्रकरणाच्या तपासकामात व्यस्त असल्याची संधी साधत हे संशयित रुग्ण रुग्णालयातून पसार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत पोलिसांनी  मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.