News Flash

कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेणार नाही : धनंजय मुंडे

डॉक्टर, पोलीस, शासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान करा असं ते म्हणाले.

पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. सर्वत्र लॉकडाउनच्या परिस्थितीत काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये लाठी – काठी वरून झालेल्या प्रकारावर ते बोलत होते.

लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले, यावरून धनंजय मुंडे यांनी कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेतले जाणार नाही असा सूचक इशारा दिला आहे.

मुंडे यांनी याबाबत फेसबुक वरून एक पोस्ट केली आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक खरेदी किंवा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत, त्या नियमांचे पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही; असे मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन करा; उपमुख्यमंत्र्यांची स्थानिक स्वराज संस्थांना सूचना

पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय अधिकारी – कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटाशी सामना करण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा, कायद्याबाबत आदर ठेवावा व शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे हे सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे, कोरोना विषाणूचा सामना घरात राहून व संसर्ग होण्यापासून रोखणे यातूनच केला जाऊ शकतो असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:17 pm

Web Title: coronavirus dhananjay munde on police doctors attacks will punish jud 87
Next Stories
1 महामार्गांवर टोल वसुली बंद; गडकरींच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले…
2 नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण, महाराष्ट्रात १२४ करोनाग्रस्त
3 पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : उपमुख्यमंत्री
Just Now!
X