शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर जिल्हा बंदी तोडून मुंबई हुन बीडला आल्याने त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करूण त्यांचे इतरत्र अलगीकरण ( होम क्वारंटाईन ) करावे अशी मागणी, पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप शिरसागर समर्थकांनी केली होती. मात्र पोलीस आयुक्तांच्या परवानगीनेच औरंगाबादहूनआल्याचे स्पष्ट करत कोरोनाच्या संकटातही काही लोक बालिश राजकारण करत असल्याचा टोला जयदत्त क्षीरसागर यांनी लगावला. त्यामुळे पुन्हा काका पुतण्यातील कुरघोडीचा रंगला आहे.

बीडचे शिवसेना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कुटुंबियांसह शनिवारी खाजगी वाहनाने जिल्ह्यात दाखल झाले. शहरातील नगर रस्त्यावरील बंगल्यातच क्षीरसागर व राजकीय विरोधक पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर राहतात.त्यामुळे राष्ट्रवादी चर्या नगरसेवकांनी जयदत्त क्षीरसागर हे जिल्हाबंदी तोडून आलेली असुन त्यांच्यापासून संसंर्ग चां धोका आहे.त्यांची रुग्णालयात तपासणी करून शासकीय रुग्णालय किंवा इतर ठिकाणी अलगीकरण करावे, अशी तक्रार आ. संदीप क्षीरसागर समर्थक नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर पोलिस काय कारवाई करू येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र रविवार दि.5 एप्रिल रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माध्यमांना बोलताना, आपणास शासकीय नियम माहीत असल्याने पोलीस आयुक्तांच्या रितसर परवानगीनेच बीड जिल्ह्यात आलो आहे.कोरोना संकटावर मात करण्यासाठी पूर्ण कौशल्य आणि शक्ती लावण्याऐवजी काही लोक उथळ आणि बालिश पद्धतीने आरोप करत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात असल्याचे सांगत राजकारण करण्यासाठी मैदान मोकळे आहे असा टोलाही पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला. विधानसभा निवडणुकीनंतर करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर कुटुंबातील कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. याच मुद्यावरून काका – पुतणे समर्थकही समाज माध्यमातून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करू लागले आहेत.

काका – पुतणे एकाच इमारतीत !
शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कुटुंब आणि वाहन चालकासह शनिवारी दुपारी नगर रस्त्यावरील निवासस्थानी आले. याच इमारतीत त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर परिवारासह राहत असल्याने त्यांच्या समर्थकांनी तातडीने जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. एकाच इमारतीत असल्याने त्यांच्यापासून आ.क्षीरसागर यांच्या कुटुंबियांनाही संसर्गाचा धोका असल्याचे तक्रारीत म्हटले होते.