अत्यावश्यक सेवा कुठल्याही स्थितीत बंद करणार नाही, परंतु अनावश्यक व्यवहार बंद करायला हवे. पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स, कपड्यांसारखी दुकानं बंद ठेवण्याचे सांगण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात ८०० रूग्णांपैकी ४२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपचार सुरु असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून आणखी रिपोर्ट येणे बाकी असल्याचे टोपे यांनी सांगितले. करोनाचा आजार बरा होणारा आहे. संशयित रूग्णांसोबत दुजाभाव करू नये, असे अवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री

टोपे म्हणाले की, बाहेर देशातून आलेले आणि लक्षणं दिसली तरच टेस्ट केली जाणार आहे. करोना पसरू नये म्हणून आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. करोनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील एनआयव्हीला भेट देणार असून आधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी पत्रकारांना सोबत नेणार नाही.

आणखी वाचा- Coronavirus: चाचण्यांसाठी राज्यात आणखी पाच प्रयोगशाळा उघडणार : आरोग्यमंत्री

वर्क फॉर्म होमला प्रधान्य देण्याची गरज आहे. “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी घरुन काम करा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निर्णय घेत आहोत. जेणेकरुन सार्वजनिक वाहतूक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने मह्त्तावाचे निर्णय घेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.