News Flash

अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; केल्या महत्त्वाच्या सूचना

वेतन कपात रद्द करून पगार पूर्ववत करावा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करताना मनसे नेते अमित ठाकरे.

राज्यातील करोना परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई आणि इतर काही शहरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. राज्यातील आरोग्य सेवेविषयी असलेल्या प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज (२२ मे ) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. या सूचनावर लवकर कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठाकरे यांना दिलं.

अमित ठाकरे यांनी केलेल्या सूचना…

१) करोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी, यासाठी एक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन विकसित करावं.

२) बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांची वेतन कपात रद्द करून त्यांचा पगार पूर्ववत करावा.

३) प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यायलाच हवी.

४) प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत व त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 8:30 pm

Web Title: coronavirus mns leader amit thackeray met to rajesh tope bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा : लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या ग्रामपंचायतींच्या मासिक सभा होणार पूर्ववत
2 महाराष्ट्रात नवे २९४० करोना रुग्ण, ६३ मृत्यू, संख्येने ओलांडला ४४ हजारांचा टप्पा
3 …मग पंतप्रधान तरी कुठं पीपीई किट घालून फिरतायत; हसन मुश्रिफांचा भाजपावर पलटवार
Just Now!
X