करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभऱामध्ये लॉकडाउन सुरु असतानाही अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा कारण नसताना बाहेर पडताना दिसत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा आणि आरोग्य विभागाने सोशल डिस्टंन्सींगचा अवलंब करण्याच्या, घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकपासून ते सहज फिरण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. नाशिकमध्येही असे प्रकार पहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गरज नसतानाही गाड्यांवरुन फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्याच जप्त करण्याच आदेश दिले आहेत. जप्त केलेल्या गाड्या थेट तीन महिन्यांनी देण्यात येणार आहेत. या शिवाय नागरे-पाटील यांच्या सुचनेनुसार वेळोवेळी आवाहन करुनही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करुन त्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय लॉकडाउनची घोषणा केली आहे. लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही वेळोवेळी करत आहेत. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करुन अनेकजण बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांनी थेट गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गाडीवरुन बाहेर विनाकारण भटकण्यास जाणाऱ्यांवर कारवाई झाली तर गाडी थेट जून महिन्याच्या शेवटी मिळणार आहे.

विश्वास नागरे-पाटील अनेक ठिकाणी स्वत: जाऊन सुरक्षेचा आढावा घेताना दिसत आहेत.

वारंवार आवाहन करुनही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही नाशिक पोलिसांनी ट्विटवरुन दिली आहे. गंगापूर पोलीस स्थानकात १५ जणांविरोधात, उपनगर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध तर देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> तुकाराम मुंढेंचा निर्णय; ‘लॉकडाउन’मध्ये नागपूरमधील नद्यांचा करणार कायापालट

नाशिक पोलिसांनी लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांचा व्हॉट्सअपवरुन पास पुरवणे, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डब्बा पोहचवणे, थेट घरी किराणा मालाचे सामान कसे मागवता येईल या आणि अशा अनेक विषयांची माहिती ट्विटवरुन शेअर केली आहे. शहरात एकट्या राहाण्यांची गैरसोय नको म्हणून १०० हॉटेल्सला किचन सुरु ठेऊन घरी पार्सल सेवा देण्याची मुभाही देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus nashik ips vishwas nangare patil ordered to seize vehicles of those who roaming in city unnecessarily scsg
First published on: 30-03-2020 at 08:19 IST