News Flash

Coronavirus: राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार

देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत.

देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे.

या संदर्भात काढलेल्या अधिकृत पत्रकात शरद पवार म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.”

“विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 8:20 pm

Web Title: coronavirus ncps big decision mlas and mps will pay one months salary to assistant funds aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाकरे सरकारचा इशारा : डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास हाऊसिंग सोसायटीवर कारवाई
2 Coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला करोनाचा पहिला रुग्ण
3 फूड डिलिव्हरी बॉईजना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही – गृहमंत्री
Just Now!
X