24 September 2020

News Flash

दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ६९.६४ टक्क्यांवर

(संग्रहित छायाचित्र)

देशात आणि राज्यात दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परंतु आज एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांती संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल १३ हजार ४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या आता ३ लाख ८१ हजार ८४३ इतकी झाली आहे.

बुधवारी राज्यात १२ हजार ७१२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह केसेस आहे.

तर दुसरीकडे राज्यात चोवीस तासांमध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात १८ हजार ६५० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो आता ६९.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 8:49 pm

Web Title: coronavirus patients numbers increased in maharashtra more than 13 thousand patients got discharge today maharashtra jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 यवतमाळमध्ये करोना मृत्यूदर २.६८ टक्के; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के
2 राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचणीच्या दरात कपात
3 चंद्रपूर जिल्ह्यात करोना नियंत्रणासाठी ‘ट्रेस, टेस्टींग आणि ट्रिटमेंट’ ही त्रिसूत्री राबवली जाणार
Just Now!
X