महाराष्ट्रात आज ४ हजार ९१३ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १८ लाख २४ हजार ९३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.६२ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ५३७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात राज्यात ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५६ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
COVID-19 tally in Maharashtra rises to 19,28,603 with addition of 3,537 new cases; 70 deaths push toll to 49,463: state health department
— Press Trust of India (@PTI_News) December 30, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख, ७२ हजार २५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २८ हजार ६०३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८० हजार व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज राज्यात ३ हजार ५३७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ही १९ लाख २८ हजार ६०३ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.