News Flash

आज महाराष्ट्रात ९६४ करोना रुग्णांना डिस्चार्ज, १०५ बाधितांचा मृत्यू

दिवसभरात २१९० रुग्णांची नोंद

३१ मे पर्यंत एनएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेस्को, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत कार्यरत

मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावीमधून आज एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. आजही धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.

– आजही राज्यात २,१९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली.

– महाराष्ट्रात करोनाचे एकूण रुग्ण ५६,९४८ आहेत. त्यात ३७,१२५ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

– आज ९६४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत १७,९१७ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

– आज दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

– मुंबईत ३४,०१८ करोना रुग्ण आहेत. त्यात ८४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २४,५०७ अजूनही अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 9:08 pm

Web Title: current count of covid19 patients in the state of maharashtra dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा : ‘युथ फॉर चेंज’ तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप
2 उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 वर
3 खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण-फडणवीस
Just Now!
X