लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरासह जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस २९ जून रोजी शहरात दाखल होणार आहेत. अकोल्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून, विदर्भातील सर्वाधिक मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. रुग्णवाढ व मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात अद्याापही यश आले नाही. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाºयांशी संवाद साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्याा अकोला शहराचा दौरा करणार आहेत.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठ येथील कोविड केअर केंद्राला ते दुपारी ४.२५ वाजता भेट देतील. त्यांचे सोबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर, आ.गोवर्धन शर्मा, आ.प्रकाश भारसाकळे आ. हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल राहतील. त्यानंतर ते सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतील. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ते प्रसारमाध्यमांशी चर्चा करणार आहेत.