25 November 2020

News Flash

धनंजय मुंडे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल

आता प्रकृती स्थिर असल्याचीही दिली माहिती

धनंजय मुंडे (संग्रहित)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीव्र पोटदुखीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून त्यांना होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर आहे लवकरच पुन्हा सेवेत दाखल होईन असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाचीही लागण झाली होती. त्यावेळीही त्यांनी मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ते करोनामुक्त झाले. आता त्यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या उसतोड कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले होते. सामाजिक प्रश्नासाठी एकत्र आलो तर गैर काय? असा प्रश्न त्यावेळी त्यांनी विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 4:26 pm

Web Title: dhananjay munde admitted to lilavati hospital mumbai scj 81
Next Stories
1 शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर; दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन
2 अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3 जमिनी विकून चार दिवस बीएमडब्ल्यूमध्ये फिराल, पुढे काय?; महसूलमंत्र्यांचा सवाल
Just Now!
X