लातुर-मुंबई ही रेल्वे बिदरऐवजी परळी पर्यंत विस्तारीत व्हावी, यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अधिक प्रयत्नशील आहेत. याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट भेट घेतली. त्यांची ही भेट सकारात्मक पार पडली असून परळीकरांवर प्रभू कृपा होईल, असे संकेत सध्या मिळाले आहेत. लातुर-मुंबई रेल्वे बिदरऐवजी पळीपर्यंत विस्तारीत करण्याच्या मागणीला प्रभूंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

रेल भवनातील या भेटीत प्रभुंनी परळीकरांसाठी केलेल्या मुंडेंच्या मागणीवर सकारात्मक विचार करु असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लातुर-मुंबई ही रेल्वेसेवा बिदरऐवजी परळीपर्यंत कधीपर्यंत धावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. लातुर-मुंबई ही रेल्वेसेवा बिदरऐवजी परळीपर्यंत विस्तारीत करावी या मागणीसह परळी शहरातुन आणखी एक मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी, तसेच नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम नगरप्रमाणेच परळी बाजुनेही सुरू करावे, अशी मागणी ही मुंडे यांनी यावेळी केली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. परळीच्या रेल्वेच्या प्रश्नात त्यांनी ही लक्ष घालावे तसेच राज्यातील तुरीच्या गंभीर बनलेच्या प्रश्नाच्या संदर्भात केंद्र शासनाने हस्तक्षेप करुन या शेतकर्‍यांची शिल्लक असणारी तूर खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही केली.