मराठा समजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी ७ सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीस बैठकीला मराठा आरक्षण समितीसह प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी आज बीडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना दिली आहे. तसेच, यावेळी मेटेंनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्य्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार विनायक मेटे म्हणाले की, “मराठा समाजाच्या आरक्षणासहित नोकरभरती, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल किंवा तुमचं राज्य मागासवर्ग नव्हे तर जातीय आयोग रद्द करणं असेल, या सगळ्या विषयांबद्दल अनेक दिवसांच्या मागणीनंतर, पाठवपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे मंगळवार ७ सप्टेंबर रोजी, दुपारी साडेबारा वाजता मुंबईत बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि ते मुख्यमंत्री देतील अशी अपेक्षा आम्ही या निमित्त व्यक्त करत आहोत.”

तसेच, “त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा, की जो राज्य मागासवर्ग आयोगाकडे सगळ्यात महत्वाची कामं आहेत, या आयोगावर वडेट्टीवार या माणसाने बहुताशं जातीवादी लोकं नेमलेली आहेत. म्हणून हा मागासवर्गीय आयोग नसून जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो ताबडतोब बरखास्त होणं. महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. हे देखील आमचं म्हणणं आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसने जातीवाद पसरवण्याचं काम दिलंय की काय? अशी शंका आम्हाला मोठ्याप्रमाणावर येत आहे.” असंही यावेळी विनायक मेटे यांनी बोलून दाखवलं.

“…ओबीसींचं आरक्षण मागू नका”, विजय वडेट्टीवारांचा मराठा नेत्यांना इशारा

तर, “आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोधही नाही. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसींमधून आरक्षण मागू नये”, असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.