जिल्हा सहकारी बँकेच्या माणकेश्वर शाखेस पुन्हा एकदा संतप्त खातेदारांनी टाळे ठोकले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान, निराधारांच्या पगारी, ठेवीदारांच्या ठेवी तसेच बचत खात्यावरील रक्कम बँकेतून दिली जात नसल्याने संतप्त खातेदारांनी बँकेला टाळे ठोकून आंदोलन केले.
सरकारच्या वतीने जिल्हा बँकेच्या माणकेश्वर शाखेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ११ गावांच्या गारपीट व रब्बी पिकांचे नुकसानीचे अनुदान शाखेत जमा झाले. भूम तालुक्यातील आष्टा गावामधील ८०० शेतकऱ्यांचे गारपिटीचे ४१ लाख १५ हजार रुपये अनुदान आले. परंतु जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पसे दिले जात नाहीत. दरम्यान, २ डिसेंबरला आष्टा गावातील लोकांनी भूम-वारदवाडी रस्त्यावर अनुदान मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी भूमचे तहसीलदार अरिवद बोळंगे यांनी २५ ते २९ डिसेंबपर्यंत अनुदान मिळण्याची मुदत दिली होती. या मुदतीत अनुदान प्राप्त झाले नाही, तर शाखेतील संबंधितांवर नसíगक आपत्ती कायद्याखाली गुन्हा नोंदविण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारीही बँकेत निधी उपलब्ध नसल्याने अखेर आष्टीतील लाभार्थ्यांनी पोलीस निरीक्षक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देत बँकेस टाळे ठोकले. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही बँकेला दिवसभर टाळे दिसून आले.