News Flash

गणेशोत्सवात डिजे वाजवल्यास कारवाई होणार

 गणेशोत्सवात मिरवणुकी दरम्यान डिजे वाजवण्याचा विचार करत असाल तर हा विचार सोडून द्या.

गणेशोत्सवात मिरवणुकी दरम्यान डिजे वाजवण्याचा विचार करत असाल तर हा विचार सोडून द्या. कारण गणेश मिरवणुकी दरम्यान डिजेचा दणदणाट तुम्हाला चांगलाच महागात पडू शकणार आहे. ध्वनी प्रदुषणाची मर्यादा ओलांडली तर तुम्हाला १ लाख रुपये दंड आणि पाच वर्षांपर्यंत शिक्षा देखील होऊ शकणार आहे.

गणेशोत्सवा दरम्यान डिजेच्या दणदणाटाला आवर घालण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांना तसेच नागरिकांना गणपती मिरवणुकी दरम्यान डिजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. अलिबाग पोलिसांनी नुकतेच याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. गणेशोत्सव मंडळांना तसेच नागिरकांना हे परिपत्रक वाटले जाणार आहे. गणपती मिरवणुका काढताना ध्वनी प्रदुषण होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे, डिजेचा वापर टाळण्याचे, आणि पारंपिरक वाद्यांचा वापर करून मिरवणुका काढण्याचे आवाहन केले जाणार आहे. राज्यात ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० अस्तित्वात आला आहे. यानुसार ध्वनिप्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतुद करण्यात आली आहे. ध्वनीप्रदुषणाचे नियम मोडणाऱ्यांवर १ लाख रुपये दंड आणि ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे. अलिबागमध्ये हळदी समारंभात डिजे वाजवणाऱ्या ५ जणांवर या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकांसाठी डिजेचा वापर टाळावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी केले आहे.

राज्यशासनाकडून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला अत्याधुनिक ध्वनी प्रदुषण मापक यंत्र उपलब्ध झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकादरम्यान या यंत्रांचे वापर करून ध्वनी प्रदुषणाची मोजणी केली जाणार आहे. ही मोजणी करतानाचे छायाचित्रण केले जाणार आहे. निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डिबी तर रात्रीच्या वेळी ४५ डिबी ध्वनी मर्यादा ठेवणे अभिप्रेत आहे. ही मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत वऱ्हाडे यांनी दिले आहेत. मात्र पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणपती मिरवणुका काढणाऱ्या मंडळांना बक्षीस देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:53 am

Web Title: dj ban in ganesh chaturthi celebrations
Next Stories
1 राज्यात कृषी शिक्षणाचेही यंदा तीन तेरा!
2 सोलापूरच्या कांदा व्यापाऱ्याची ३५ लाखांची फसवणूक
3 ‘या घाणीत आम्हाला प्रयोग करायचाय’, सुमित राघवनने काढले औरंगाबादमधील नाट्यगृहाचे वाभाडे
Just Now!
X