अमित ठाकरे यांच्या रुपाने आणखी एक ठाकरे राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे हे आता राजकारणात काही वेगळा प्रयोग करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अमित ठाकरेही ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतले आहेत. आदित्य ठाकरे यांनी युवकांचे प्रश्न हाती घेतले. त्यानंतर आमदारकीची निवडणूक लढवली. ती निवडणूक जिंकली. मंत्रीही झाले. आता तशीच काहीशी अपेक्षा अमित राज ठाकरे यांच्याकडून आहे. ते राजकारणात त्यांची खास स्टाईल निर्माण करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आत्तापर्यंत आपण पाहिलं की ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसेवक आणि विचारवंत आणि लेखक होते. त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख म्हणून परिचित असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी काय करीश्मा घडवला हे आपण पाहिलेच आहे. बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे या दोघांनीही शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. मात्र पुढे जाऊन राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला.

mou signed politics marathi news, ravikant tupkar marathi news
आता राजकारणातही उघड सामंजस्य करार! शेतकरी संघटनेचे ‘एमओयू’नंतर रविकांत तुपकर यांना पाठबळ
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
Right of primary teachers to participate in active politics
‘प्राथमिक शिक्षकांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाया पक्षाने थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. मात्र शिवसेना आपल्या काही मुद्द्यांवर ठाम राहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि समर्थपणे पेलून दाखवली. आता आज मनसेच्या मेळाव्यात अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. आपण जाणून घेऊया कोण आहेत अमित ठाकरे.

कोण आहेत अमित ठाकरे?

  • अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत, त्याच प्रमाणे ते उत्तम स्केचेसही काढतात. तसंच व्यंगचित्रकारही आहेत.  त्यांच्या फेसबुक पेजवर राज ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, अमिताभ बच्चन, मि. बिन यांची काही स्केचेस त्यांनी पोस्ट केली आहेत.
  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित ठाकरे यांनी काही रोड शो वगैरे केले होते. मनसेचा प्रचारही त्यांनी त्यांच्या शैलीत केला होता.
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात.
  • कार्यकर्त्यांसोबत राहून काम करण्यावर त्यांच्या अधिक विश्वास आहे. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यापुढचे शिक्षण त्यांनी कॅनडा येथील वेस्टमिनिस्टरच्या डग्लस कॉलेजमधून घेतले आहे.
  • अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेचा विषय ठरले आहेत. अमित ठाकरे उत्तम फुटबॉलही खेळतात
  • मागच्याच वर्षी अमित ठाकरेंनी त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेशी लग्न केलं. या विवाहसोहळा मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला राजकारण आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती

अमित राज ठाकरे यांची आज अधिकृतरित्या राजकारणात एंट्री झाली आहे. आता ते काय करीश्मा घडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.