बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी नांदेड येथील एका डॉक्टर आणि त्याच्या पत्नीविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.दत्ता धनवे आणि अनुराधा धनवे असं या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ४४ लाखांची बेहिशेबी मालमत्ता जमा आढळून आली. हिंगोलीत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना डॉ.दत्ता मारोती धनवे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा दत्ता धनवे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या पथकाने धनवे यांच्या श्रीनगर परिसरातील राधाकिशन अपार्टमेंट येथील घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता ४४ लाखांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. १५ जुलै १९९० ते ३१ ऑक्टोबर २०१० या काळात धवने यांनी आरोग्य अधिकारी म्हणून काम केलं होतं. शासकीय सेवा काळात मिळालेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४४ लाख ९७  हजार ६८३ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे आढळून आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेहिशोबी मालमत्ता संपादीत करणार्‍या डॉ.दत्ता धनवे आणि अनुराधा धनवे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?