News Flash

फेसबुक मैत्रीनंतर नोकरीच्या आमिषाने डॉक्टर महिलेवर बलात्कार

शिर्डी पोलिसांनी विजय अण्णासाहेब मकासरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

rape victim
प्रतिकात्मक छायाचित्र.

कथित सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा

दंतचिकित्सक महिला डॉक्टरला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात व खासगी हॉटेलमध्ये वेळोवेळी बलात्कार करून तिला धमकी दिल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांवर बलात्काराचा गुन्हा रविवारी दाखल केला.

पीडित महिला ही संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी विजय अण्णासाहेब मकासरे (मूळ रा. वळण, ता. राहुरी, हल्ली इंदिरानगर, श्रीरामपूर) याची व माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपी मकासरे याने नोकरीचे आमिष दाखवून सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात व शिर्डीतील हॉटेल प्रतीक व नगरपंचायतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका हॉटेलवर अशा वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन वेळोवेळी बलात्कार करून मारहाण करून धमकी दिली.  या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी विजय अण्णासाहेब मकासरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 1:48 am

Web Title: doctor woman allegedly raped by facebook friend in shirdi
Next Stories
1 तुळजापूरमध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटला; ऊसतोड मजूर कुटुंबातील ३ जण ठार
2 येत्या अधिवेशनात मी मंत्री असेन : नारायण राणे
3 गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; कृषीमंत्र्यांचे निर्देश
Just Now!
X