News Flash

मुंबई दूरदर्शनच्या ‘गजरा’चे निर्माते विनायक चासकर यांचं निधन

ठाण्यात घेतला अखेरचा श्वास

सौजन्यः दूरदर्शन

दूरदर्शन मुंबईच्या स्थापनेपासून तिथे कार्यरत असणारे निर्माते विनायक चासकर यांचं वृद्धापकाळानं काल मध्यरात्री निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.

दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रावर निर्माते म्हणून रुजू झाले. त्यांनी मराठी नाट्यविभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळले.

विनायक चासकर यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यापैकी ‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. याचे ८०पेक्षा अधिक भाग प्रसारीत झाले. या कार्यक्रमातून मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अनेक कलाकार लोकप्रिय झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, सुरेश खरे हे त्यापैकीच काही. १९८४ सालच्या, त्यांची निर्मिती असलेल्या ‘स्मृतीचित्रे’ या त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर त्यांच्या ‘आश्रित’ या नाटकालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

विनायक चासकर हे दूरदर्शन मुंबईच्या स्थापनेपासून म्हणजे १९७२ सालापासून तिथे कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली. दूरदर्शमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठीच्याच अनेक मालिकांचं दिग्दर्शनही केलं. नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.

काल मध्यरात्री वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.  त्यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 2:19 pm

Web Title: doordarshan producer vinayak chaskar died today vsk 98
Next Stories
1 सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाल्या…
2 “त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?”
3 विनंती! देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; ‘सीडीआर’वरून काँग्रेसने दिला सल्ला
Just Now!
X