सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थितीविषयी लोकप्रतिनिधींकडून सतत ओरड होत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा महसूल प्रशासनाने सुधारित पसेवारी जाहीर केली आहे. यात एकूण ११४४ गावांपकी ९४५ गावांची पसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तथापि, जिल्ह्य़ातील उर्वरित १९९ गावांची पसेवारी देखील पन्नास पशांपेक्षा कमी असताना ती जास्त दाखविण्यात आल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. पन्नास पशांपेक्षा जास्त पसेवारी दाखविण्यात आलेल्या गावांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणीही केली जात आहे.
जिल्ह्य़ात बार्शी, सांगोला व मोहोळ या तीन तालुक्यांतील सर्वच्या सर्व गावांची पसेवारी पन्नास पशांपेक्षा कमी असल्याचे महसूल प्रशासनाने म्हटले आहे.
यापूर्वी जिल्ह्य़ातील पसेवारी जाहीर करताना त्यात ६४५ गावांची यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यानंतर केलेल्या सुधारित पसेवारीमध्ये आणखी तीनशे गावांचा समावेश करण्यात आला. यात माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक ७६ गावांमध्ये पन्नास पशांपेक्षा कमी पसेवारी दाखविण्यात आली आहे. करमाळा-५५, पंढरपूर-५७, सांगोला-२८, अक्कलकोट-१२, मंगळवेढा-८, बार्शी-१६ यांचा त्यात समावेश आहे.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Loss of crops on three and a half thousand hectares due to unseasonal rain
बुलढाणा : ‘अवकाळी’चा शंभर गावांना फटका, साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी; ३०९ घरांची पडझड