भाजपामधून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. पुण्याजवळील भोसरी येथील भूखंडाच्या संबंधित व्यवहारांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली असून त्यासाठी त्यांना ३० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुद्द्यावर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मोजक्या शब्दात उत्तरं दिली. खडसेंनी मात्र पत्रकारांना एक प्रश्न विचारला तेव्हा पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

चंद्रकांत पाटील यांचं अजित पवारांना चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

“३० तारखेला मला बोलावण्यात आलं आहे. मी ईडीला नक्कीच सामोरा जाणार आहे. या आधी माझी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग अशी अनेक विभागांमार्फक आतापर्यंत चार वेळा चौकशी झाली आहे. यावेळीही मी चौकशीला सामोरा जाणार आहे”, असे खडसे म्हणाले. ही माहिती दिल्यावर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही फारशी उत्तर दिली नाहीत. खडसे फारशी माहिती देत नाहीत हे पाहून अखेर काही पत्रकारांनी त्यांना हिंदीत माहिती देण्याची विनंती केली. त्यानुसार खडसेंनी सगळी माहिती हिंदीत दिली. ही माहिती घेऊन झाल्यावरही पत्रकार त्यांना विविध प्रश्न विचारत होते. पण त्यांनी काहीही अधिक माहिती दिली नाही. याउलट, “आता इंग्लिशमधून पण हीच सगळी माहिती कोणाला हवीय का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

दरम्यान, “आता मी ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईन. CDचं नंतर बघू. भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही माझी पाचव्यांदा चौकशी होत आहे. तो भूखंड मी विकत घेतलेला नसून तो माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे ५ कोटींचा आहे. याप्रकरणी चौकशी होत आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेन”, असेही ते म्हणाले.