02 March 2021

News Flash

जळगावमध्ये खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक

मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवत जाळपोळ केल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत:च्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर जळगावमधील खडसे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
खडसे यांच्या राजीनाम्यामुळे कुठेतरी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसेच, खडसेंच्या मतदार संघाचा भाग असलेल्या मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवत जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. तसेच, स्थानिक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली असून याठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेयं.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता ते जळगावकडे रवाना होणार असल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:21 pm

Web Title: eknath khadse supoorters get violent after his resignation
टॅग : Eknath Khadse
Next Stories
1 ‘शर्तभंग’प्रकरणी कारवाईला खडसेंचा खो
2 रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाची सर्वदूर हजेरी
3 दुधाच्या आधारभूत किमतीचा प्रस्ताव अडगळीत
Just Now!
X