वर्तमानपत्राची पार्सले घेऊन जाणारी जीप आणि मालमोटारीची समोरासमोर जोराची धडक होऊन जीपमधील ११ जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ८ पुरुष, २ महिला व दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. लातूर-नांदेड महामार्गावरील  चाकूरनजीक गुरुिलग आश्रमाजवळ शुक्रवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
जीपमधील दहा जण जागीच ठार, तर अन्य एकाचा लातूर येथे उपचार घेताना मृत्यू झाला. दोन गंभीर जखमींवर लातूर येथे उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगी व एका महिला नातेवाइकाचा समावेश आहे. अहमदपूरकडे जाणारी मालमोटार (एमपी २२ एच २२०) व वर्तमानपत्राचे पार्सल वाटप करून चाकूरकडे येणारी जीप (एमएच २४ व्ही ७६३८) या दोन वाहनांची धडक झाली.
मृतांची नावे अशी : दादाराव फावडे (वय ३८, लासोणा, तालुका देवणी, जिल्हा लातूर), नामदेव मारुती शेळके (वय २७), विजयकुमार शंकर रावते (वय २८, दोघेही नांदगाव, तालुका चाकूर), नागनाथ बालाजी केसाळे (वय २५, नागेशवाडी, तालुका चाकूर), दत्ता हुल्लाप्पा शेंडगे (वय ६०, पोलीसवाडी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड), प्रशांत शिवाजी पवार (वय ३०), अश्विनी प्रशांत पवार (वय २७), श्व्ोता प्रशांत पवार (वय २, तिघेही तावशीगड, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद), अनिता सुधाकर कोपरकर (वय ३५, उजनी, तालुका औसा), अमोल भालचंद्र नागरगोजे (वय २५, जीपचालक, दवणगाव, तालुका रेणापूर) या दहाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या धनंजय रंगराव कदम (म्हाळुंब्रा, तालुका औसा) यांचा लातूर येथे उपचार घेताना मृत्यू झाला.
अनिल रामदास संकेतवाड (आदिलाबाद, आंध्र प्रदेश) व गोिवद कातळे (वय ४०, कुंभारी, तालुका रेणापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी जावळे, सहायक निरीक्षक शिवदास लहाने यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मयत व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, माजी आमदार  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, पं.स. सभापती करीमसाहेब गुळवे, शिवसेना तालुकाप्रमुख नंदकुमार पवार यांच्यासह सामाजिक कार्यकत्रे यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. अपघात एवढा भीषण होता, की जेसीबीच्या साह्य़ाने जीपमधील काही मृतांना व जीपला बाजूला काढावे लागले.