कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलली जाण्याच्या हालचाली सुरु आहेत असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवले गेले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी नवीन मूर्तीची पाहणी केल्याने या चर्चेला उधाण आल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर लोकसत्ता ऑनलाईनने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशीच संपर्क साधला. मात्र तूर्तास असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनला सांगितले आहे.  नव्या मूर्तीची पाहणी केली म्हणजे त्याचा अर्थ जुनी मूर्ती बदलणार असा होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर

नव्या मूर्तीची पाहणी केल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुरातन मूर्ती बदलण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. त्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुजारी यांच्यामध्ये याबाबतची कोणती चर्चाही झालेली नाही. वज्रलेप करण्यात आल्यानंतर आत्ता मंदिरात असलेली पुरातन मूर्ती सुस्थितीत आहे. काही मूर्तीकार वर्षभरापासून मूर्ती बनवत आहेत, ती  मूर्ती पाहण्यासाठी गेल्यानंतर त्याचा अर्थ असा होत नाही की सध्या जी पुरातन मूर्ती आहे ती बदलली जाईल असंही जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या अंबाबाईची जी पुरातन मूर्ती होती ती भग्न झाली होती मात्र त्यावर वज्रलेप दिल्यानंतर ती मूर्ती सुस्थितीत आहे. काही दिवसात या मूर्तीचं स्ट्रक्चरल ऑडिटही केलं जाईल. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुरातन मूर्तीची ताकद लक्षात येईल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र समिती देशभरातल्या मोठ्या पंडितांना आणि धर्म मार्तंडाना एकत्र बोलवून याबाबत चर्चा केली जाईल. या चर्चेनंतर लोकशाही आणि भारतीय संस्कृतीला अनुसरुन मूर्ती बदलायची की नाही त्याचा निर्णय घेऊ, मात्र तूर्तास अशी कोणतीही चर्चा नाही. ज्या प्रसारमाध्यमांमध्ये या बातम्या चालवल्या जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही असंही जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाईची पुरातन मूर्ती बदलण्यात येणार आहे अशी चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरु होती. त्यावेळी ती मूर्ती भग्न झाली होती मात्र त्या मूर्तीवर वज्रलेप देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी नव्या मूर्तीची पाहणी केल्याने पुरातन मूर्ती बदलण्यात येणार आहे असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही असा कोणताही प्रस्ताव नाही असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लोकसत्ता ऑनलाईनला सांगितले आहे.