News Flash

शहापुरात व्यापाऱ्यावर गोळीबार

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

शहापुरातील धान्याचे व्यापारी रमेश अग्रवाल (५९) यांच्यावर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रमेश यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शहापूर येथील गंगारोड परिसरातून रमेश अग्रवाल दुचाकीवरून घराकडे निघण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हल्ल्यामागच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:04 am

Web Title: firing on traders in shahapur abn 97
Next Stories
1 पश्चिम वऱ्हाडात करोना उद्रेकातही नेत्यांचा बेजबाबदारपणा
2 निसर्ग वादळात कोसळलेले विद्युत खांब अद्याप शेतातच
3 पंढरपूरमध्ये निवडणुकीनंतर करोना रुग्णसंख्येत वाढ
Just Now!
X