News Flash

चेंबूरमधील सहा जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळय़ाच्या दिवसातील कामे संपवून सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा जणांचा मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण चेंबूरच्या घाटला गावात राहणारे छोटे बांधकाम व्यावसायिक

| July 7, 2014 02:54 am

उन्हाळय़ाच्या दिवसातील कामे संपवून सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा जणांचा मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण चेंबूरच्या घाटला गावात राहणारे छोटे बांधकाम व्यावसायिक होते. तर मृतांमध्ये शिवसेनेच्या एका उपशाखाप्रमुखाचाही समावेश आहे.
चेंबूरमधील घाटला गावातील १७ बांधकाम व्यावसायिकांचा चमू शनिवारी मुरुड येथे गेला. हे सर्वजण येथील पार्वती लॉजमध्ये मुक्कामाला होते. यापैकी सात जण रविवारी सकाळी समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात आतवर गेले व बुडाले. यामधील अनिल मोतीराम भालत हे कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, रोहित जाला, विनोद अजई, दिनेश पवार, दिलीप गोळे, संजय पांचाळ आणि शंकर चव्हाण यांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण ४०-४५ वयोगटातील आहेत. त्यांचे मृतदेह एकदरा येथील समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर काढण्यात आले.

 प्रतिनिधी, अलिबाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 2:54 am

Web Title: four people drawn in murud sea
Next Stories
1 शेट्टींचा भोकरवर तर जानकरांचा मुखेड, लोहा मतदारसंघांवर दावा
2 औरंगाबाद जिल्हय़ात भाकप तीन जागा लढविणार!
3 लातूरमध्ये महागाईविरोधात काँग्रेसचा मोर्चा
Just Now!
X