News Flash

महावितरणच्या परीक्षेमध्ये कॉपी करणारे चार ‘कॉपीबहाद्दर’ अटकेत

मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमात दाखवल्याप्रमाणे कॉपी

महावितरणच्या परीक्षेत कॉपी करणारे चार विद्यार्थी अटकेत

महावितरणच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान हायटेक पद्धतीने कॉपी करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमात अभिनेता संजय दत्त ज्या प्रमाणे कॉपी करताना दाखवला आहे काहीशी त्याच पद्धतीने हे चौघेजण कॉपी करत होते, अशी माहिती समोर आली आहे.  पोलिसांनी या चौघांकडून लॅपटॉप, मोबाईल, कार्ड रिडर जप्त केले आहे. तसेच या चौघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महावितरण विभागाच्या भरतीची परीक्षा रविवारी होती. जयभवानी नगर भागात ही परीक्षा सुरु होती. या ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्रात तपासणी केली. तिथे जीवन गिरजाराम जघाळे, निलेश कापूरसिंग जोनवाल, पवन कचरू बहुरे आणि दत्ता कडुबा नलावडे हे चौघेही माईकच्या मदतीने कॉपी करत असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी या चौघांनाही अटक केली. तसेच त्यांच्याकडे असलेला लॅपटॉप, कार्ड रिडर आणि इतर साहित्य जप्त केले. औरंगाबाद परिमंडळ क्रमांक २ चे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 9:19 pm

Web Title: four students arrested in aurangabad who were coping in mahavitaran examination
Next Stories
1 औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचे थैमान, ५०० पेक्षा जास्त रूग्ण उपचारांसाठी रूग्णालयात
2 बीडचा तरुण जायकवाडी धरणात बुडाला
3 औरंगाबादमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X