18 September 2020

News Flash

कोल्हापुरात दहा केंद्रात मोफत करोना चाचणी सुविधा

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल ही केंद्रे केवळ गरोदर मातांसाठी राखीव

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर: करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह दहा कुटुब कल्याण केंद्राच्या ठिकाणी शहरातील नागरिकांची मोफत स्वॅब चाचणी सुविधा करण्यात आली आहे. यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.

आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्वॅबची सुविधा उपलब्ध केली होती, शहरवासियांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने आता शहरातील दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी मोफत चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे.सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल ही केंद्रे केवळ गरोदर मातांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 7:11 pm

Web Title: free corona testing facility at ten centers in kolhapur scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा, उदयनराजेंचा इशारा
2 महाराष्ट्रात रेडीरेकनरचे दर वाढले, १२ सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर
3 “करून दाखवलं… करोनाबाधितांच्या संख्येत जगात महाराष्ट्र पाचव्या स्थानी;” निलेश राणेंचा शिवसेनेला टोला
Just Now!
X