News Flash

केंद्राच्या धोरणांमुळेच इंधन दरवाढ-चव्हाण

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर सतत ढासळतोय,

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (संग्रहित छायाचित्र)

कराड : करोनाच्या संकटकाळात जगभरातील राष्ट्रांनी आपल्या जनतेला थेट मदत दिली. पण, केंद्र सरकारने २१ लाख कोटींच्या पॅकेजमध्ये १९ लाख कोटींची कर्जे घेण्याचे सुचवून जनतेच्या तोंडाला पाने पुसली.  करोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा, त्याच्या किमतींचा घोळ याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, तर इंधन दरवाढीमागे केंद्र सरकारची उत्पादन शुल्कवाढ हे कारण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर सतत ढासळतोय, तो गतवर्षी उणे राहिला. माध्यमांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करत याबाबत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांबरोबरच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस देशभर आवाज उठवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. मात्र, इंधनाचे दर उच्चांकी भडकत असून, त्यामागे केंद्र सरकारची उत्पादन शुल्कवाढ हेच कारण आहे. या पैशातून ते आपला तोटा भरून काढत आहे.

केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, सन २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत १४५ डॉलपर्यंत वाढली. तरीही पेट्रोल, डिझेलचे दर मर्यादित राहिले होते. मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या बॅरलची किमती ५० डॉलर दरम्यान असताना लिटरला पेट्रोल शंभर, तर डिझेल ९२ रुपयांवर, तसेच स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:14 am

Web Title: fuel price hike is due to wrong policies of central government congress leader prithviraj chavan zws 70
Next Stories
1 १५ वैद्यकीय महाविद्यालयांत ६०१ पदव्युत्तरच्या जागा वाढणार!
2 बारावीची परीक्षा रद्द केल्याने पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेशावर संकट
3 मानव-वन्यजीव संघर्ष रोखणारे ‘मुंढे प्रारूप’
Just Now!
X