साचलेल्या पाण्यात पडून एक बालिका मृत्युमुखी पडली, तर तिची बहीण जखमी झाली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी माळकर तिकटी येथे घडला. सानिया नजीर देसाई (वय १०) असे दुर्दैवी बालिकेचे नांव आहे.    देसाई कुटुंबिय हे मटण मार्केटजवळ राहतात. महापालिकेजवळ असलेल्या माळकर तिकटी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोल पाया काढण्यात आला आहे. गेले कांही वर्षे हे बांधकाम रखडलेले आहे. पाया काढलेल्या खड्डय़ामध्ये पाणी साचलेले आहे. तेथे खेळण्यासाठी देसाई भगिनी गेल्या होत्या. पाण्यात खेळतांना सानिया व खतिजा (वय ८) या दोघीही त्यामध्ये बुडाल्या. हा प्रकार लक्षात आल्यावर दोघींना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.