25 May 2020

News Flash

दोन लाखांची घोषणा, पण खात्यात रुपयाही नाही

कीटकनाशक विषबाधाग्रस्तांची दैन्यावस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

कीटकनाशक विषबाधाग्रस्तांची दैन्यावस्था

कीटकनाशक फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर  केली असली आणि केंद्र सरकारकडून आणखी मदत देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले असले तरी अजूनही लालफितशाहीच्या जोखडात अडकडलेल्या प्रशासनापायी एकाही शेतकरी कुटुंबाच्या हाती एक छदामही पडलेला नाही, हे कटू वास्तव समोर आले आहे. मदतीअभावी विषबाधाग्रस्त शेतकरी-शेतमजुरांची दैन्यावस्था झाली आहे.

सातबारा असलेला शेतकरी आणि नसलेला अर्थात शेतमजूर असा फरक करून सातबारा असलेल्या शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत योजनेतून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ज्यांच्याजवळ सातबारा नाही अशा मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायलाच सरकारने कालापव्यय केला. अखेर मुख्यमंत्री निधीतून अशा शेतकऱ्यांना देखील दोन लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती येथे जिल्हा प्रशासनाने दिली. विशेष हे की, यवतमाळ जिल्हयात फवारणीचे २० बळी गेले आहेत. त्यापकी १३ शेतकरी सातबारा उताराधारक असून सातजण शेतमजूर आहेत. यांना कधी पसे मिळणार या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर त्यांच्या खात्यात आम्ही  पसे टाकू असे देण्यात येत आहे.

शेतमजूर अक्षरश देशोधडीला

बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आज ना उद्या मदत मिळेल. मात्र, जे उपचार घेत आहेत अशा साडेसातशेच्यावर विषबाधाग्रस्त शेतकरी-शेतमजुराचे अक्षरश हालहाल होत आहे. रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे शेतमजूर अक्षरश देशोधडीस लागण्याच्या रस्त्यावर आले आहेत. मात्र, त्यांना मदत देण्यासाठी शासनाचे हात पुढे येत नाही हे विदारक चित्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जावून भेटून आलेल्या विषबाधाग्रस्त शेतमजुरांच्या व्यथा ऐकून वार्ताहर परिषदेत दाखवले.

फवारणी बंद

या प्रकरणामुळे शेतात फवारणीसाठी मजूरच मिळत नसल्यामुळे फवारणी बंद आहे. ही एक नवी समस्या उद्भवली आहे. उपचार घेऊन घरी गेलेले काही शेतकरी पुन्हा संक्रमण झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा उपचारासाठी दाखल होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2017 2:50 am

Web Title: government announcement two lakhs rs for farmers who death due to pesticide poisoning
Next Stories
1 पाच वर्षांत १७ कोटी प्रवाशांची एसटीकडे पाठ
2 गर्भवतीला पकडणे ‘गूड मॉर्निंग’पथकाच्या अंगलट
3 लोकपाल, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर जानेवारीत देशव्यापी आंदोलन – हजारे
Just Now!
X