नव्याने निवडून आलेले खासदार, संसदेचे सदस्य तसेच विधानमंडळाचे सदस्य यांच्या शपथविधीसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्या अशी मागणी करणारं पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यसभेत भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेतल्यावर जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. या सगळ्या घटनेनंतर शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांना लिहिलं आहे.

महाराष्ट्रात मंत्रिपदाची शपथ घेताना काही सदस्याना आपण शपथ लिहिली आहे त्याच स्वरुपात कोणतीही नावं न जोडता पुन्हा वाचण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. त्याचंही स्मरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पत्रामध्ये केलं आहे. शपथेच्या प्रारुपानुसार फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या विचार विनिमय करुन सर्व संबंधितांना सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत असं राज्यपालांनी म्हटलं आहे.