भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते नितीन गडकरींच्या पुर्ती ग्रुपने आपल्या संपत्तीबाबच चुकीची माहिती दिल्याबद्दल प्राप्तीकर विभागाने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पुर्ती ग्रुपला नोटीस बजावली आहे. प्राप्तीकर विभागाचे आयुक्त मयांक प्रियदर्शनी यांनी पूर्ती कारखान्याच्या व्यवहारांची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने पूर्ती ग्रुपला नोटीस बजावली आहे. यानुसार पूर्ती ग्रुपला पाच सप्टेंबरपर्यंत संपत्तीविषयी सर्व माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर पूर्ती विरोधात प्राप्तीकर विभागाने आणखी दाखल केलेल्या चार याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.