News Flash

हृदयद्रावक: करोनामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईनेही सोडला प्राण!

उस्मानाबादमधील हिंगळजवाडी येथील घटना; परिसरात शोकाकुल वातावरण

उस्मानाबादमधील हिंगळजवाडी तालुक्यातील रमाकांत उर्फ पापा मधुकर नाईकनवरे (वय ५०) यांचे गुरुवारी करोनामुळे निधन झाले. यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच रमाकांत यांची आई सुशीला मधुकर नाईकनवरे (वय ७०) यांचेही निधन झाले. या दोन्ही माय-लेकावर हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे.

करोनाचा उस्मानाबाद जिल्ह्यात उद्रेक झाला असून दररोज ७०० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत गंभीर आजार असलेले रुग्ण दगावत होते. आता दुसऱ्या लाटेत वृद्धासह तरुणही दगावत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असून जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा बळी जात आहे.

हिंगळजवाडी येथील पापा नाईकनवरे हे करोना पोसिटीव्ह असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनाची माहिती त्यांच्या मातोश्री सुशीला नाईकनवरे यांना दुःख अनावर होऊन त्यांनीही घरी जीव सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 9:25 pm

Web Title: heartbreaker the mother also gave up her life after realizing that her child had died due to corona msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले”
2 राज्यात लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावर आरोग्यमंत्री टोपेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…”, भाजपा नेते अवधूत वाघ यांचं वादग्रस्त ट्वीट!
Just Now!
X