मान्सूनला आठवडा शिल्लक असला तरी विदर्भात मात्र सूर्य कोपलेला असून तापमान कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे विदर्भातील जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. नवतपामध्ये रविवारीही चंद्रपूर ४६.८, तर नागपूरला ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धेत ४६.२, ब्रह्मपुरी ४६.१, अकोला ४४.९, अमरावती ४४.४, यवतमाळ ४३.८, बुलढाणा, ४२, वाशिमला ४२.६ तापमान होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. नवतपामध्ये यावेळी नागपूरचे सर्वोच्च तापमान ४७.१ अंश सेल्सिअस होते. दोन वर्षांपूर्वी नागपूरचे तापमान मे महिन्यातही ४५ अंशाच्या वर गेले नव्हते. यावेळी मात्र चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि नागपूरला उष्म्याचा जबर तडाखा बसला आहे. चंद्रपुरात यंदाचे राज्यातील सर्वोच्च तापमान नोंदले गेले असून पारा ४८ च्या जवळ पोहोचेल, असा अंदाज आहे.
४६.८ चंद्रपूर
४६.५ नागपूर