07 December 2019

News Flash

धारूरच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीचा खून

आरोपींच्या अटकेसाठी मंगळवारी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

धारुरमध्ये बंद; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बीड : धारूरच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळची ही घटना मुलीच्या लग्नाला दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी फरार आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे धारूर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आरोपींच्या अटकेसाठी मंगळवारी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

नामदेव शिनगारे (वय ५२) यांची सोमवारी सायंकाळी शहरापासून जवळ असलेल्या एका शेतामध्ये डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली. सायंकाळी उशिरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी शहरात दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीच्या अटकेसाठी तीन पथके तयार केल्यानंतर गणेश घोडके आणि सुभाष िशदे या दोघांना ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी सुखदेव प्रभाकर फुन्ने मात्र फरार झाला आहे. शिनगारेंच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी दिवसभर बाजारपेठ बंद राहिली. मृत शिनगारे यांचा मुलगा सुदर्शन यांच्या तक्रारीवरून तिघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मुख्य आरोपी सुखदेव खुन्ने यांना मुलीच्या लग्नात दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on August 14, 2019 4:22 am

Web Title: husband of ex dharur city mayor murdered zws 70
Just Now!
X