News Flash

बदलत्या राजकारणात मलाही बदलावे लागेल – शिवेंद्रसिंहराजे

शिवेंद्रसिंहराजे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांच्याकडे आपला राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त करताना शिवेंद्रसिंहराजे.

राजकीय वातावरण बदलत आहे. यामुळे आता बदलत्या वातावरणाप्रमाणे मलाही बदलावे लागेल, असे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे समर्थन केले. तसेच आपण गेल्या दहा वर्षांत पक्षासाठी खूप काम केले. मात्र पक्षाकडून आपल्याला अपेक्षित सहकार्य, मदत मिळाली नाही. उलट माझ्यावर अन्यायच झाल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

शिवेंद्रसिंहराजे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला. बुधवारी ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा येथे आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना  त्यांनी हे  मत व्यक्त केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:33 am

Web Title: i also have to change in changing politics says shivinder singh abn 97
Next Stories
1 उजनीत २३ दिवसांत ३२ टीएमसी पाण्याची आवक
2 पिचडांसाठी भाजपचा प्रवास खडतर?
3 रायगडमध्ये भाजपची महत्त्वाकांक्षा वाढली
Just Now!
X