News Flash

“मी लस घेतली, तुम्ही पण घ्या…”; ९५ वर्षीय आजींनी निर्माण केला आदर्श!

लसीकरण मोहीमेस दिले प्रोत्साहन ; आजींचा लस घेण्याचा आग्रह कुटुंबासाठी आश्चर्यकारक ठरला

नीट चालता बोलता येत नसूनही लस घेण्याची होती तीव्र इच्छा

मी लस घेतली, तुम्ही पण घ्या…असा संदेश देत वर्धेतील एका ९५ वर्षीय आजींनी राज्यातील लसीकरण मोहीमेस एकप्रकारे ऊर्जाच दिल्याचे अनोखे उदाहरण पुढे आले आहे.

सावंगी मेघे लगत राहणाऱ्या भुतडा परिवारातील कमलादेवी गणेशनारायनजी भुतडा या आजींचा लस घेण्याचा आग्रह कुटुंबासाठी आश्चर्यकारक ठरला. चालता व व्यवस्थित बोलता येत नसल्याने या आजी लसीपासून दूर होत्या, मात्र मुलगा नंदकिशोर हा फार्मासिस्ट असल्याने घरी करोना विषयी चर्चा व्हायची. ती ऐकून आजींनी विचारपूस केल्यावर सून मीना भुतडा यांनी त्यांना सावंगीच्या रुग्णालयात लस देण्याचे ठरविले. पण सावंगीत गर्दी असते..मला दुसरीकडे न्या असे आजीने म्हटल्यावर या परिवाराचे स्नेही व रोटरीचे पदाधिकारी राजकुमार जाजू यांनी स्वाध्याय मंदिरातील केंद्राची माहिती दिल्याचे ओम भुतडा यांनी सांगितले. त्यानुसार आजी या केंद्रावर पोहोचल्या व केंद्रात संगीता इंगळे यांनी आजीचे स्वागत करीत नीट चालूही न शकणाऱ्या आजींना लस देण्याबाबत उपस्थित डॉक्टरांना सुविधा देण्याची विनंती केली. त्यानंतर आजीने लसीचा पहिला डोस घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 10:13 pm

Web Title: i took the vaccine you take it too 95 year old grandmother created an ideal in front of the citizens msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री परवाना नूतनीकरणाला उद्यापासून सुरुवात
2 Corona Update : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, दिवसभरात ३८८ मृत्यूंची नोंद!
3 “विभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा”
Just Now!
X