पुणे पदवीधर मतदारसंघाची येऊ घातलेली निवडणूक आपण लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुख आणि साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील म्हणाले, “मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून या निवडणुकीत उमेदवारी करायची या जिद्दीने मी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. निवडणुकीची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीही मी केली. यावेळी थेट आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी स्तरापर्यंत माझा संपर्क आलेला आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनवधानाने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. यात श्रीनिवास पाटील विजयी झाले, त्यानंतर मी हा निर्णय बदलला.”

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
former leader of the opposition Dattatraya Waghere withdrawal nomination form
मावळमध्ये ठाकरे गटात बंडखोरी? माजी विरोधी पक्षनेत्याने घेतला उमेदवारी अर्ज
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप
akola lok sabha 2024 marathi news, akola congress lok sabha candidate marathi news,
अकोल्यात काँग्रेसचे ठरेना; उमेदवाराची प्रतीक्षा

पोटनिवडणुकीत पक्षाने श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. ही निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील अनेक कामात माझा थेट संपर्क येऊ लागला आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार पाटील यांचे काम पुढे घेऊन जाणे, मतदारसंघातील कामे होणे गरजेचे आहे. जर मी पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत लक्ष घातलं तर सातारा मतदारसंघातील कामे मागे पडतील. यासाठी मी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण सारंग पाटील यांनी दिले.

माझा निर्णय निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मी कळवला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही माझा निर्णय कळविला आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी यासाठी जबाबदारीने काम करणार असल्याचे सारंग पाटील म्हणाले.